Fri. May 14th, 2021

माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला

जयसिंगराव गायकवाड यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला…

औरंगाबाद – भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. गायकवाड यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा याबद्दल चर्चा होतांना दिसत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव गायकवाड नाराज होते.

गायकवाड हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत तर राज्य मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होते. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानं जयसिंगराव गायकवाड यांनी बंडखोरी करत अर्ज सादर केला होता. आता बंडखोरी करणार नाही, मात्र आता पक्षातही राहणार नाही, अशी भूमिका जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केली आणि भाजपच्या सर्वच पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केलं आहे. यापूर्वी मराठवाडा पदवीधर मतदार संघात दोनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *