Tue. Jun 15th, 2021

नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव बंद, शेतकरी नाराज

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारसमित्यांचे आज सकाळपासून लिलाव बंद केला आहे.

यंदा देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याचा भाव गगनाला भिडले असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे व्यापारी वर्ग संभ्रमात असून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे आज सकाळपासून लिलाव बंद केले आहेत.

व्यापारी नाराज

व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी उमराने आणि लासलहगाव लिलाव बंद पाडला आहे.

केंद्र सरकारने निर्यीतबंदी केल्यानंतर व्यापाऱ्यांवर लादलेल्या कांद्याच्या साठवणूक मर्यादेमुळे व्यापारीवर्ग संभ्रमात आहे.

यामुळे मुंगसे, उमराणे, आणि लासलगाव येथील व्यापाऱ्यांनी अजूनही लिलाव सुरु केला नाही.

लिलाव सुरु न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला आहे.

लासलगाव, उमराने, मुंगसे, सुटाणा, नामपूर, चांदवड बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहे.

शेतकरी रस्त्यावर आल्याने बाजार समित्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *