Fri. Dec 3rd, 2021

म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे रास्तारोको

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

गेल्या काही दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याने राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. शंभर आणि दोनशेरुपये प्रतिक्विंटल विकला जाणाऱ्या कांद्यांने अचानक साडेतीन हजार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत उच्चांक गाठला होता.

 

मात्र, शनिवारी हाच भाव दोन हजार रुपयाने घसराल्यामुळे नगरमधील शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून रस्ता रोको केला. दरम्यान, जर कांद्याचे भाव अशेच कोसळत राहिले तर कांदा उत्पादक देशोधडीला लागेल आणि आत्महत्येशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *