कांद्याच्या दरात मोठी घसरण

देशभरात कांदाच्या दरात घसरण झाली असून लासलगाव बाजार समितीमध्ये 100 ते 150 रुपयाने कांदाच्या भावात घसरण बघायला मिळाली आहे. कांदाच्या दरात नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राकडून उपाययोजना सुरू आहेत. कांदा आयात करण्यासाठी निविदा काढत निर्यातसाठी 850 डॉलर शुल्क केंद्र सरकारने लागू केला होता.
कांद्याच्या दरात घसरण –
कांदा दरात नियंत्रण मिळवण्याकरीता केंद्राकडून उपाययोजना करण्यात आल्या आहे.
लासलगाव बाजार समिती मध्ये 100 ते 150 रुपयाने कांदा भावात घसरण झाली आहे.
2 हजार 700 रुपये इतका सरासरी आज कांद्याला भाव मिळाला आहे.
केंद्र सरकारने कांदा आयात साठी निविदा काढला असून 850 डॉलर शुल्क लागू केला होता.
मागणी पेक्षा कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने दर फार घसरणार नाहीत असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
कांद्याचे आवक कमी असल्याने जास्त प्रमाणात कांद्याचे दर कोसळणार नाहीत असंही सांगितले आहे.