Tue. Dec 7th, 2021

सोनं-नाणं नव्हे, चोरट्यांनी लुटले साडे 8 लाख रुपयांचे कांदे!

पैशांची किंवा दागदागिन्यांची चोरी होत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण तुम्ही कधी कांद्यांची चोरी झाल्याचं ऐकलं आहे का? बिहारमधील पटनातील सोनारू मध्ये काही चोरट्यांनी कांद्यांचे गोदाम फोडून साडे आठ लाख रूपयांच्या कांद्याची चोरी केली आहे.

लाखो रुपयांचे कांदे चोरीला!

कांद्याचं गोदाम फोडून चोरांनी पावणे दोन लाख रुपये चोरलेच.

मात्र त्यांनी एकूण  328 कांद्यांच्या गोण्यादेखील चोरल्या.

या कांद्यांची एकूण किंमत साडे आठ लाख रुपये एवढी होती.

हे गोदाम गजबजाटापासून दूर असल्यामुले चोरी झाल्याचं आधी कुणालाच कळलं नाही. मंगळवारी सकाळी जेव्हा मालकाने गोदाम उघडलं, तेव्हा त्याला लाखो रुपये किंमतीची ही लूट दिसून आली.

त्याने पोलीसात तक्रार केली आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. घटनेची पोलीस तपासणी करत आहेत. सध्या कांद्याने सामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत मात्र चोरांनी साडे 8 लाख रुपये किंमतीचे कांदे चोरल्यामुळे व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *