Wed. Oct 5th, 2022

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

महापालिकेने  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज व कार्यवाही करता येणार  आहे. अंतिम मुदत 19 ऑगस्टपर्यंत असेल. त्यामुळे  www.mcgm.gov.in अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेचे आवाहन

गणेशोत्सव जवळ येत असल्याने  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीस पालिकेची परवानगी घेणे गरजेचे असते.

अर्ज भरण्यास बराच वेळ जातो यामुळे पालिकेने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ही परवानगी प्रक्रिया मागील वर्षापासून मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ऑनलाइन केली आहे.

तसेच यासाठी अर्ज करताना, त्यासोबत मुंबई पोलिस व वाहतूक पोलिसांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ही गरजेचे आहे.

पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सादर होणारा अर्ज स्वयंचलित पद्धतीने पोलिसांकडे व वाहतूक पोलिसांकडे जाणार आहे.

पोलिस व वाहतूक पोलिसांनी अर्ज प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांची ‘हरकत’ किंवा ‘ना-हरकत’ नोंदविणे अपेक्षित आहे.

‘ना-हरकत’ दिल्यानंतर अर्जावर पालिकेच्या प्रभाग कार्यालयाद्वारे आवश्यक ती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

यानंतर संबंधित अर्जदारास ई-मेलद्वारे अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली जाईल. याच ई-मेलमध्ये परवानगीसाठी आवश्यक ते शुल्क कसे भरावे? हे ही त्यात असेल.

ई-मेलमध्ये दिलेल्या तपशीलानुसार अर्जदाराने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग प्रणालीचा अवलंब करून पालिकेकडे शुल्क जमा करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.