Mon. Dec 6th, 2021

ऑनलाइन साईट्सवर गर्भपात करणाऱ्या औषधांची सर्रास विक्री

आजकालच्या डिजिटल युगात सगळेच ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडतात. Amazon, Flipkart, Myntra अशा अनेक नावाजलेल्या ऑनलाइन शॉपिंग कंपनी ग्राहकांना सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट ऑनलाइन शॉपिंग साईट्सद्वारे मागवू शकतात. या ऑनलाइन शॉपिंग साईट्सवरून कपड्यांसह भाजीपाला तसेच औपधेही उपलब्ध आहेत. मात्र यामुळे गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या ऑनलाइन खुलेआम होम डिलिव्हरी देण्यात येत आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप पुणे केमिस्ट असोसिएशनने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर गर्भपात करण्यासाठी औषधे खुलेआम विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे केमिस्ट असोसिएशनने खुलेआम गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणारे औषधे उपलब्ध असल्यामुळे आक्षेप घेतला आहे.
हा प्रकार पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी उघडकीस आणला आहे.
काही दिवसांपूर्वी विवेक यांनी Amazon या ऑनलाइन साईटवर गर्भपातासाठी वापरण्यात येणारे औषधांची जाहिरात पाहिली.
ही जाहिरात बघितल्यानंतर विवेक यांनी या साईटवरून ऑनलाइन ऑर्डर दिली.
मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय होम डिलिव्हरी देण्यात आली.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विकण्यावर बंदी असतानाही औषधे सहजपणे उपलब्ध असल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला.
गर्भपातीसाठी वापरण्यात येणारी औषधांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असे विवेक यांनी समोर आणले आहे.
त्यानंतक आता अन्न आणि औषध विभाग यावर काय कारवाई ? करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *