Sun. Jun 20th, 2021

अवघ्या 899 रुपयांमध्ये करा विमान प्रवास

आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु विमान प्रवास महाग असल्याने अनेकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहतं.

पण आता अवघ्या 899 रुपयांमध्ये विमानसफर करता येणार आहे.

इंडिगो या एअरलाईन्स कंपनीने वर्षाअखेरीस ही घोषणा केली आहे. ‘द बिग फॅट इंडिगो सेल’ असे या सेलचे नाव आहे.

इंडिगोच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमान प्रवासासाठी 899 तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 2 हजार 999 मोजावे लागणार आहेत. या योजनेची माहिती इंडिगोने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

या योजनेनुसार प्रवाशांना देशात आणि परदेशात आवडेल त्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे.

तिकीट बुकिंग प्रक्रिया एकूण 4 दिवस चालणार आहे. 23 डिसेंबर- 26 डिसेंबर या 4 दिवसांच्या कालावधीत तिकिट बुक करता येणार आहे.

तसेच काही निवडक बँकेच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डने तिकिटचं पेमेंट केल्यास कॅशबॅक देखील मिळणार आहे.

या योजनेनुसार प्रवाशांना नववर्षात 15 जानेवारी-15 एप्रिल या कालावधीत देशात आणि परदेशात कुठेही विमानप्रवास करता येणार आहे.

इंडिगोच्या वेबसाइटवरुन किंवा इंडिगो मोबाइल अ‍ॅप वरून ही बुकिंग करता येऊ शकणार आहे. इंडिगोच्या या खास ऑफरला प्रवाशांनी भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *