Wed. Jan 19th, 2022

दुसऱ्या टप्प्यातच विरोधकांना घाम फुटला – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगावात सभा घेतली. या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर खरमरीत टीका केली. तसेच पाच वर्षात केलेल्या कामचा पाढा वाचला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. तसेच पंतप्रधान मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर बातचीत करणार का ? यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी मोदींनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

आतापर्यंत 2 टप्प्यातील भाजपाने अव्वल कामगिरी केल्यामुळे विरोधांना घाम फुटला आहे.

आघाडीच्या काळात भारतात अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट झाले.

तेव्हा कॉंग्रेस- राष्ट्रवादी शोक सभा घेत होते.

मात्र आता सैनिकांना हात लावण्याची ते हिम्मत करू शकत नाही असे मोदी म्हणाले.

पाच वर्षानंतर प्रत्येक भारतीय जगासमोर ताठ मानेने उभा राहू शकतो.

मोफत वीज देण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केलं असल्याचा दावा मोदींनी केला.

आदिवासींच्या विकासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

शेतकऱ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले.

गावागावांमध्ये रस्ते बनवण्याचे काम सुरू केल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नसतील त्यांच्या खात्यात पैसे येतील असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *