Jaimaharashtra news

संपूर्ण कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि भाजपच्या आमदारांनी पायर्‍यांवर बसून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं. यावेळेस विरोधकांनी जोरजोरात घोषणा दिल्या.

तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरुन सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले फडणवीस ?

शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या सरकारने केले आहे. फक्त 20 हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीसाठी देण्यात आली आहे.

ती पण कधी भेटणार माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राहण्यासाठी 36 मजली इमारत बांधावी. पण शेतकऱ्यांना दुर्लक्षित करु नये, असंही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version