Sun. Sep 19th, 2021

भाजपात पुन्हा एकदा मेगाभरती सुरू; ‘हे’ नेते करणार प्रवेश ?

विधानसभा निवडणुकींपूर्वी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा मुलगा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरमधील कॉंग्रेसचे आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.. येत्या 1 सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची शक्यता आहे.

भाजपात जोरदार मेगाभरती सुरू –

जसजसं विधानसभा निवडणूक जवळ येत असून विरोधी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत.

अवघ्या काही महिन्यांवर ठेपले असलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युतीत प्रवेश करत असल्याचे म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा मुलगा जगजितसिंह पाटीलसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सोलापुरमधील कॉंग्रेसचे आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले आहे.

येत्या 1 सप्टेंबर रोजी  भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत.

त्याचबरोबर नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विरोधी पक्षातील अनेक नेते युतीत प्रवेश करत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा बसणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *