Tue. May 17th, 2022

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विरोधकांचं प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले तसेच विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाषणातील ९० टक्के विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच भाजपाला सोडले म्हणजे गाढवाला सोडले, अशी टीकाही शिवसेना पक्षप्रमुखांनी फडणवीसांवर केली.

मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, या टोमण्यांवर या वाफांवर कितीदा शेम करावे… अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावर भाष्य केलं. ‘देवेंद्र फडणवीस तुम्ही जर तिथे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती, अशा बोचऱ्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये मुख्यमंत्री गुढघ्याला हेडफोन लावून बसलेले आहेत. फोटो ट्विट करताना त्यांनी लिहिले की, तुम्ही देवेंद्रजींच्या वजनावर बोलतात, तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून गुढघ्याला हेडफोन लावल्यांच आठवलं…, असे त्यांनी लिहिले.

तसेच, सत्तेसाठी लाचार चेहरा लपवण्यासाठी बोलताना किती कसरत करावी लागते ना उद्धवजी… अशी प्रतिक्रियाही अतुल भातखळकर यांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या सभेवर तसेच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधलेल्या निशाण्यावर भाष्य केलं आहे.

पाहा हा व्हिडिओ :

शिवसेनेच्या सभेवर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

तसेच, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, भ्रष्टाचाऱ्यांपासून… होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, वसुलीजीवी लोकांपासून… होय आम्हाला मुंबई स्वतंत्र करायची आहे, मुंबईकरांच रक्त पिणाऱ्या बांडगुळांपासून…’ असे त्यांनी ट्विट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.