Sat. Oct 1st, 2022

‘वाईन विक्रीचा विरोध फार चिंतेचा नाही’ – शरद पवार

राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईन विक्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. वाईन विक्रीचा विरोध फार चिंतेचा नाही, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवार म्हणाले, वाईन आणि इतर पेयांमधील फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच आज वाईन विक्रीचा निर्णय चिंताजनक असेल असे मला वाटत नाही. परंतु इतर राजकारण्यांना वाटत असेल तर राज्य सरकारने निर्णय बदलला तरिही वाईट वाटायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

‘भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा’ – जितेंद्र आव्हाड

किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे. वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा, अशी टीका जिंतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसचे मध्यप्रदेशमध्ये घरात बार उघडायला परवानगी देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात ६०० दुकांनांमध्ये वाईनसाठी परवानगी मिळणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

1 thought on “‘वाईन विक्रीचा विरोध फार चिंतेचा नाही’ – शरद पवार

  1. Really liked the post you posted . it just isnt that easy to discover even remotely good posts toactually read (you know.. really READ and not simply browsing through it like a zombie before going to yet another post to just ignore), so cheers man for not wasting my time on the god forsaken internet.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.