Fri. Aug 12th, 2022

आदित्य यांच्या दौऱ्यावर विरोधकांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ११च्या सुमारास आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे सर्वांचे लक्ष आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्ताने विरोधकांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपा नेते नितेश राणे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टीका केलीय.

नितेश राणे यांनी ट्विट केले की, सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली!!

मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट केले की, आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर  घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राज साहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असण यातला फरक आहे.

हा दौरा राजकीय – दरेकर

तसेच आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.