Mon. Jul 22nd, 2019

ऑरेंज सिटीमध्ये ऑरेंज अलर्ट

0Shares
नागपूर शहर सध्या सूर्य देवतेच्या निशाण्यावर आहे का? असा प्रश्न सोशल मीडिया मध्ये विचारला जातोय, अनेक वॉल पेपर आणि कार्टून्सच्या माध्यमातून नागपूर मध्ये सूर्य आग ओकतोय आणि त्याची तीव्रता दाखविणारे पोस्टर्स फिरत आहे, नागपुरात सध्या गर्मी वाढत असून सूर्याचा प्रकोप मोठा होताना दिसून येत आहे .नागरिकांना रस्त्यावर चालताना त्याचा त्रास जाणवत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे . तापमान सामान्य पेक्षा 6 ते 7 अंशाने वाढलं असल्याने अलर्ट देण्यात आला आहे, साधारण मे महिन्याच्या अखेरीला नागपूरचा पारा 45 डिग्री ओलडतो मात्र यंदा मे च्या सुरुवातीलाच ऑरेंज अलर्ट दिल्याने मे महिन्याच्या शेवट किती हॉट असेल याचा अंदाज लावणं देखील असह्य होत आहे.

हवामान खातं वेगवेगळ्या या  रंगातून दर्शवतं उन्हाची तीव्रता

1 – हिरवा रंग ( कुठलाही सावधानतेचा इशारा नाही, सामान्य तापमान)

 

2- हलका नारंगी रंग ( पारा वाढण्याची शक्यता, 35 ते 40 पर्यंत पारा जाऊ शकतो )

 

3 – नारंगी रंग ( पारा 40 ते 45 पर्यंत जाण्याची शक्यता, उन्हाची तीव्रता वाढत)

 

4 – लाल रंग ( पारा 45 ते 50 च्या पुढे जाण्याची शक्यता, अतिदक्षतेचा इशारा)

 

कसा असतो महापालिकेचा हिट अॅक्शन प्लान ?

नागपूरची ओळख हिरव शहर म्हणून आहे, इतर शहरांच्या तुलनेत नागपूरमध्ये वृक्ष संपदा अधिक आहे असं असलं तरी नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा देखील तितकाच कडक असून तो दिवसेंदिवस वाढत जातोय या पासून बचाव म्हणून नागपूर महापालिकेने नागरिकांच्या उन्हं पासून रक्षणासाठी दरवर्षी हिट अॅक्शन प्लॅन हाती घेत असते.महापालिका दुपारच्या वेळी उद्यान उघडी ठेवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयन्त या माध्यमातून करत असते.

मजूर भर उन्हात काम करतात त्यांना दुपारचा विसावा देण्याच्या सूचना

महानगर पालिकेने शहरातील सगळी उद्यान दुपारच्या वेळी सुरु ठेवण्याच्या सूचना
जेणे करून तिथे दुपारच्या उन्हात सावलीत आराम करता येईल
 वेगवेगळ्या ठिकाणी प्याऊ लावण्याची योजना
दवाखान्यात उष्माघातावर कोल्ड वॉर्ड, आवश्यक औषध पुरवठा
उन्हापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी पोस्टर बॅनर लावणे

उन्हापासून बचाव करण्याचे उपाय

भरपूर पाणी प्या.
शक्यतो अन्न द्रव्य स्वरूपात घेणे,
बाहेरचे खाणे टाळावे, तेलकट अन्न वर्ज्य करावे,
कॉटन चे कपडे वापरावे, डार्क कलर चे कपडे वापरू नये,
दुपारी साधं पाणी पिण्या ऐवजी ग्लुकोज पाणी प्यावे
0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: