नाशकात भोंग्यासंदर्भात आदेश बदलला

नाशिकमध्ये सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी ३ मेपर्यंत परवानगी घेणे बंधनकारक होते. तसेच परवानगी न घेतल्या गेलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. मात्र, आता नाशकात भोंग्यासंदर्भातील आदेश बदलण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाकनवरे यांनी दीपक पांडे यांचे भोंग्यासंदर्भातील आदेश रद्द केले आहेत.
नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दिपक पांडे यांचा सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केला रद्द आहे. भोंग्याबाबत शहरातील सर्व परिस्थिती विचारत घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे मत आहे. तसेच भोंग्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
काय होते माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आदेश?
भोंग्यावर हनुमान चालिसा लावायची असो किंवा अजान, पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले होते. ३ मेपर्यंत या परवानग्या आवश्यक असून ३ मे नंतर थेट पोलीस कारवाई होऊन भोंगे उतरवण्यात येतील असा इशाराही पांडे यांनी दिला आहे. ‘मुस्लिम धर्मियांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार’, ‘भोंग्यावर हनुमान चालीसा लावायचे असेल तरी परवानगी आवश्यक असल्याचे दीपक पांडे यांनी सांगितले होते.