Fri. Aug 12th, 2022

मविआच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेने पुढच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये असणार आहे.

१० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत होणार घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मविआच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे. सर्व आमदारांना ८ जूनपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश मख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआने ही भूमिका घेतली आहे.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहेत. मात्र, सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपाचे तीन उमदेवार, शिवसेनेचे दोन उमेदवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमदेवार असे सात उमेदवार राज्यसभेसाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.