Thu. Sep 29th, 2022

पुण्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

कबड्डी दिनानिमित्त कबड्डी महर्षी स्व. शंकरवार ऊर्फ बुवा साळवी राज्यस्तरीय कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. या अंतर्गत कबड्डी खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच जे खेळाडू राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतात त्यांचा सन्मान केला जातो. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, १५ जुलै रोजी होणार आहे. २० ते २३ जुलै दरम्यान या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी पुरुषांचे १६ संघ आणि महिलांचे १६ संघ निवडण्यात आलेले आहेत. तर पुणे लिग कबड्डी स्पर्धेसाठी पुरुषांचे ८ संघ आणि महिलांचे ६ संघ निवडण्यात आलेले आहेत. महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि क्रीडा संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले आहे २३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.