Jaimaharashtra news

विधानभवनात “मराठी भाषा गौरव दिन”, या कार्यक्रमाचे आयोजन

राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील विधानभवनातदेखील मराठी भाषा दिवस दिवसाचे औचित्य साधत, मराठी भाषा गौरव दिन”, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा जागर करणारा स्वरमयी सोहळा पाहायला मिळणार आहे.

मराठी संस्कृतीचा महिमा आणि मराठी भाषेची महती सांगणारा असा हा कार्यक्रम असणार आहे.

त्याचबरोबर बारा बलुतेदारांचे चित्रप्रदर्शन आणि ग्रंथदिंडी यासह संत काव्य ते चित्रपट गीत हा मराठी कवितांचा आणि गाण्यांचा सुरेल प्रवास महाराष्ट्र विधानमंडळ, विधान भवन येथे आज सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणार आहेत.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री, सुभाष देसाई, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, मराठी भाषा राज्य मंत्री, विश्वजीत कदम, विधानसभा विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडवणीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

Exit mobile version