Sun. Jan 17th, 2021

हृदयद्रावक! ‘त्या’ने सायकलवरुन नेला भावाचा मृतदेह

वृत्तसंस्था, ओडिशा

 

ओडिशामध्ये रुग्णवाहिका नसल्याने दाना मांझी यांना पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किलोमीटरची पायपीट करावी लागली होती. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

 

आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या माजुली मतदारसंघात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नाहीत. त्यामुळे एका व्यक्तीला आपल्या भावाचा मृतदेह सायकलवरुन न्यावा लागला.

 

श्वसनाच्या त्रासामुळे बालीजान गावातल्या 18 वर्षांच्या डींपल दासचा हॉस्पीटमध्ये मृत्यू झाला. या गावापासून हॉस्पीटल जवळपास 8 किमी लांब आहे..दरम्यान गावातले रस्ते खराब असल्याने कोणताही गाडीचालक त्याचा मृतदेह घेऊन जाण्यास तयार नव्हता.

 

अखेर भावानेच आपल्या भावाचा मृतदेह कापडात गुंडाळून त्याचे शव सायकलवरुन नेले. रस्ते खराब तसंच गावात येण्यासाठी वापराल्या लागलेल्या बांबूच्या ब्रीजमुळे आपल्या भावाचा मृतदेह आणण्यासाठी या व्यक्तीला मोठी कसरत करावी लागली. या घटनेनंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *