ओसामा बिन लादेनचा मुलगा ठार; अमेरिकन मीडियाची माहिती

आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हमजा बिन लादेनची हत्या अमेरिकेने घडवून आणली असल्याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्याचबरोबर अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी याबाबत काही माहिती दिली नसून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नेमकं काय घडलं ?

आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाला आहे.

हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस मिळेल अशी घोषणा अमेरिकेने केली होती.

त्याचबरोबर अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, हमजा आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी अमेरिकेवर हल्ला करणार असल्याचे चर्चा सुरू होत्या.

काही दिवसांपूर्वीच हमजा बिन लादेनने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

9/11 हल्ल्यावेळी विमान हायजॅक केलेल्या मोहम्मद अता यांच्या मुलीशी लग्न झाले होते.

अल कायदा या संघटनेमध्ये हमजा बिन लादेनला मोठे पद देण्यात आले होते.

 

Exit mobile version