Tue. Sep 28th, 2021

डिंपल कपाडिया यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटाला ऑस्कर, प्रियंकाच्या पदरी निराशा

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्हर्चुअल पद्धतीने पार पडतोय. ‘हा सोहळा लॉस एन्जेलेसमध्ये होते आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाटत पाहत असतो. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले होते. यंदा हा सोहळा अगदी वेगळ्या प्रकारे पार पडत आहे. या वर्षी कोणी-कोणी हे पुरस्कार पटकावले, ते जाणून घेऊया…

यावर्षी अभिनेता अँथनी होपकिन्सला ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाय या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

‘ऑस्कर 2021’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यावर्षी फ्रान्सिस मॅकडॉर्मंडने जिंकला आहे. ‘नोमाडलँड’ चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी त्यांना हे पदक देण्यात आले आहे. शिवाय ‘नोमडलँड’ सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपल्या नावावर केले आहे. यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘नोमाडलँड’ला मिळाला आहे.

प्रियंका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले प्रकारातही नामांकन देण्यात आला आहे. पण यावर्षीसुद्धा भारत आपल्याकडे ऑस्कर पुरस्कार आणू शकलेला नाही. सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेसाठी ‘द फादर’ला ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

डिंपल कपाडिया यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *