Sun. May 16th, 2021

Oscars2019: ‘Green Book’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

सिनेसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्काराला सुरूवात झाली आहे.

कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे.

यंदाचा ऑस्कर कोणत्या सिनेमाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’, ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायाला मिळत आहे.

आतापर्यंत ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ च्या खात्यात 3 आणि ‘रोमा’, ‘ब्लॅक पँथर’ च्या खात्यात प्रत्येक 2 ऑस्कर जमा झाले आहेत. तर ‘सुपरमॅन’नेही सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमाचा ऑस्कर पटकावला आहे.

2008 साली ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ ऑस्कर पटकावणारा पहिला सुपरहिरोपट होता.

त्यांनंतर गेल्या 10 वर्षांत कोणत्याच सुपरहिरोपटाला ऑस्करपर्यंत मजल मारता आली नाही.

परंतु या वर्षी सुपरहिरोपटांनी ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप सोडली आहे.

आतापर्यंत ‘ब्लॅक पँथर’ने 3 आणि ‘स्पायडरमॅन’ने 1 असे एकूण 3 ऑस्कर पटकावले आहेत.

यंदाच्या ऑस्करमध्ये ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या 2 सिनेमांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 10 नामांकने मिळाली आहेत.

त्यानंतर ‘ब्लॅक पँथर’ला त्याखालोखाल सर्वाधिक नामांकने आहेत.

यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता.

‘दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने 4 मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता.

पण त्याचबरोबर 1989 नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *