उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाविकास आघाडीच्या ताब्यात

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागेवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचा एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निडणुकीत महाविकास आघाडीने १५ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. १५ जागांपैकी शिवसेनेने ५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा आणि काँग्रेसने ५ जागांवर बाजी मारली आहे.
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. मात्र, ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना धोबीपछाड पहायला मिळाली.
Youre not the general blog writer, man. You certainly have something important to contribute to the World Wide Web. Such a special blog. Ill return for more.