Jaimaharashtra news

साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प

उस्मानाबाद: देशात कोरोनाच्या संकटासोबतच ऑक्सिजन तुटवड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मितीला आज सुरुवात झाली आहे . धाराशिव साखर कारखान्यात दररोज २० टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागणार आहे.

या कारखान्यात आज प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरवात झाली आहे .हा ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरून थेट कोविड सेंटर आणि रुग्णालयांना पुरवला जाणार आहे. राज्यात आणखी २४ कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.कोरोनाच्या काळात प्राणवायूसाठी संघर्ष करत असलेल्या रुग्णांसाठी हा प्रयोग संजीवनी ठरू शकतो.

Exit mobile version