रमजानच्या खरेदीसाठी टाळेबंदीचे निर्बंध शिथिल

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात रमजानच्या खरेदीसाठी टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. १२ आणि १३ मे या दोन दिवसांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

रमजान सणाच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे.सकाळी ७ ते ११ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात ८ ते १३ मे असा पाच दिवसांची कडक टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. मात्र रमजान सणासाठी टाळेबंदी शिथिल करा अशी अनेक निवेदने जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र या दोन दिवसांमध्ये कोविड-१९ चे सर्व नियम पाळणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

Exit mobile version