Fri. Sep 30th, 2022

गुप्ततेची ऐशीतैशी : ‘फेसबुक Live’ करत केलं मतदान! 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उस्मानाबादमध्ये सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान करताना मोबाईलला बंदी असतानाही एका मतदाराने चक्क मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलं.  मतदानासारखा खाजगी हक्क बजावत असताना तो इतर कुणाच्या दृष्टीस पडू नये, यासाठी खबरदारी घेणं गरजेचं असतं. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अतिउत्साही कार्यकर्ता प्रणव पाटील याने सर्व नियम धाब्यावर बसवत आपल्या मतदानाचं ‘फेसबुक Live’ केलं. अद्याप या घटनेप्रकरणी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मतदान करताना फेसबुक लाईव्ह 

लोकसभा निवडणुकांच्या  दुसऱ्या टप्प्याला आज सकाळपासून सुरवात झाली आहे.

मतदानाच्या दरम्यान मोबाईल वापरावर बंदी असते.

याचे पालन करणं, हे सगळ्या मतदारांचे कर्तव्य आहे.

पण याचे पालन न करता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने चक्क मतदान करताना ते फेसबुक लाईव्ह केले आहे.

प्रणव पाटील असे या मतदाराचे नाव आहे.

मतदानाचा हक्क बजावताना असा प्रकार करणे, यावरून मतदारराजाने मतदानाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.

हेच मतदान देशाचे भवितव्य ठरवणारे असते. या घटनेप्रकरणी प्रणव पाटीलवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.