Mon. Jan 17th, 2022

नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण एक हजारांवर

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा एक हजाराच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यात १०५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नाशिक प्रशासन अलर्ट झाले असून नागरिकांनी कोरोना नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली असली तरीही कोरोना मृत्यूचा आकडा मात्र शून्य आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असूनही कोरोना बळींची संख्या शून्य असल्यामुळे आरोग्य विभागाला काही अंशी दिलासा मिळालेला आहे.

नाशिकमध्ये ८ जानेवारी रोजी कोरोना बाधितांची संख्या ११०३ इतकी होती. त्यानंतर रविवारी कोरोना रुग्णांचा आकडा १०५६वर पोहचली आहे. दरम्यान कोरोना मृत्यूची संख्या सलग तिसऱ्या दिवशीही शून्यच आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे कार्य नाशिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून  करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *