Sat. Oct 1st, 2022

आम्ही भारताचे खरे नागरिक – असदुद्दीन ओवैसी

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे, अशी जाहीर टीका MIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. ते मुंबईच्या शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलत होते.

भारताने पाकिस्तानवर कारवाई करावी

आमच्या 40 लोकांच्या मारणारे तुम्ही जैश-ऐ-मोहम्मद नाही, जैश- ऐ- शयासीन आहे
मसूद अझर तू मौलाना नाही तू शैतान आहे
पाकिस्तानने भारतातल्या मुस्लिमांची काळजी करणं सोडून द्यावं.
आम्ही पर्याय असूनही जिन्नांना धुडकावून हिंदुस्तानचा पर्याय स्वीकारला.
भारताला आमचा देश मानलं
त्यामुळे आम्ही भारताचे खरे नागरिक आहोत
मतभेद असले तरी देशासाठी आम्ही एकत्रच
भारताने आता कारवाई करावी
आम्ही सर्वजण यासाठी पंतप्रधानांच्या सोबत आहोत.
तुम्ही काय कारवाई करणार आहात ?

माझ्या देशप्रेमासाठी मोदींच्या सर्टिफिकेटची गरज नाही

या हल्ल्याला कोण जबाबदार आहे?
हेरगिरी करणारे बिर्याणी खाऊन झोपले होते का?
40 शहिदांसाठी कोण जबाबदार आहे?
उन्नावमध्ये दलितांची हत्या होत होती, तुम्ही बोललाच नाही.
काश्मीरी लोकांना boycott करायला सांगणाऱ्या राज्यपालांना केव्हा काढणार?
साडेचार वर्षात मुस्लिमांना टार्गेट केलं गेलंय.
ज्या संघटना काश्मीरला भारताचा भाग मानत नाही, त्या संघटनांकडे मोदी आपले प्रतिनिधी पाठवतात.

आंबेडकरांना विजयी करा

आज सर्व जाती, धर्म एकत्र आले, 70 वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र आलो,
70 वर्षानंतर आमच्यासोबत न्याय झाला का?
संविधानाचा वापर करुन राजकीय शक्ती तयार झाली का?
संसदेत 10% आरक्षण विधेयक मंजूर झालं
सर्व SC, ST खासदार तोंडावर पट्टी बांधून बसले होते
रामदास आठवले फक्त दिखावा आहे
तुमचा नेता जिवंत आहे. तुम्ही त्यांना यशस्वी करा.
आंबेडकरांना विजयी करा, त्यांचं नेतृत्व मान्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.