Fri. Jul 30th, 2021

‘Oxford इंग्लिश डिक्शनरी’मध्ये ‘चड्डी’!

जगभरात इंग्रजी शब्दांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारा शब्दकोश म्हणजे ‘Oxford’ ची इंग्रजी डिक्शनरी. या डिक्शनरीमध्ये दरवर्षी इतर भाषेतील अनेक शब्दांची आयात होत असते. अनेक शब्द भारतीय भाषांमधूनही इंग्रजीमध्ये सर्रास वापरले जातात. अशाच शब्दांना या मानाच्या डिक्शनरीमध्ये स्थान मिळतं. या डिक्शनरीमध्ये एखाद्या शब्दाला स्थान मिळणं, म्हणजे इंग्रजी भाषेने तो शब्द स्वीकारणे असा त्याचा अर्थ होतो. यंदा ज्या भारतीय शब्दाला Oxford डिक्शनरीने आपलंसं केलंय, तो शब्द आहे ‘चड्डी’!

भारतात अंतरवस्त्रांसाठी वापरला जाणारा ‘चड्डी’ या शब्दाचा समावेश आता ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये केला गेला आहे.

या शब्दासोबतच आणखी 650 नव्या शब्दांचा डिक्शनरीमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे.

जगभरातील वेगवेगळ्या शब्दांचा ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये सातत्याने समावेश केला जातो.

‘चड्डी’ हा शब्द ब्रिटीश शासनाच्या वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये सापडला आहे.

ब्रिटीश-आशियाई कॉमेडी सीरिज ‘गुडनेस ग्रेशिअस मी’मध्ये हा शब्द सापडला.

1990 मध्ये बीबीसीवर येणाऱ्या भारतीय अभिनेत्री मीरा स्याल आणि संजीव भास्कर यांच्या इंग्रजी सीरिजमध्ये हा शब्द वापरण्यात आला होता..

यात ‘Kiss my a**e’ ऐवजी ‘Kiss My Chuddies’ असे संजीव भास्कर यांनी त्यांच्या डायलॉगमध्ये म्हटले होते.

‘शॉर्ट ट्राऊजर, शॉर्ट्स या रूपाने हा शब्द डिक्शनरीमध्ये देण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना Oxford इंग्लिश डिक्शनरीचे वरिष्ठ सहायक संपादक जे. डेंट यांनी सांगितले की, कोणताही नवीन शब्द डिक्शनरीमध्ये जोडण्याआधी त्यावर योग्य तो विचार केला जातो. त्यानंतरच त्या शब्दाचा डिक्शनरीमध्ये समावेश केला जातो.

26 जानेवारी 2018 मध्ये Oxford डिक्शनरीमध्ये ‘नारी शक्ती’ या शब्दाचा समावेश करण्यात आला होता.

‘हे’ भारतीय शब्दही Oxford इंग्लिश डिक्शनरीमध्ये आहेत

पंडित,

महाराज,

अवतार,

निर्वाण,

गुरू,

अच्छा,

अन्ना,

अब्बा,

बापू,

बंगला,

चमचा,

दादागिरी,

फंडा

गुलाबजामून,

गोश्त,

जुगाड,

खिमा,

मंत्र,

मिर्च मसाला,

सूर्य,

डकैत,

नाटक,

चुप,

लूट,

चटणी,

खाट,

बाजीगर,

खाकी,

जंगल,

पक्का,

पजामा,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *