Wed. Jan 19th, 2022

ऑक्सिजन टंचाईमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्याची माहिती

गेली दीड वर्षे कोरोना विषाणू संपूर् जगभरात थैमान घातले. तसेच कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले असल्याचे समोर आले, याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

देशातील १९ राज्यांपैकी १८ राज्यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची माहिती दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी लोकसभेत दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले आहे.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या टंचाईमुळे अनेक रुग्णांचे मृत्यू ओढवल्याचा मुद्दा चर्चेत राहिला होता. दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील याबाबत दाद मागितल्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारला ऑक्सिजन पुरवठ्यावरून फटकारले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने यासंदर्भात सादर केलेली आकडेवारी या सर्व बाबी फेटाळून लावणारी आहे. देशातील १९ पैकी १८ राज्यांनी त्यांच्याकडे ऑक्सिजन टंचाईमुळे करोना रुग्णांचे मृत्यू झालेले नसल्याची माहिती दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी लोकसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *