Thu. May 6th, 2021

नाशकात ऑक्सिजनची भीषण टंचाई

नाशकात ऑक्सिजनची भीषण टंचाई असल्याचं समोर आलं आहे. नाशिकमध्ये फक्त सरकारी रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे, तर खासगी रुग्णालयात मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व परिस्थितीमुळे प्रशासनानं तातडीची बैठक बोलावली आहे.

पुण्यातील एका कंपनीने नाशिकचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे, तर संगमनेरहुन होणारा ऑक्सिजनचा पुरवठादेखील खंडीत झाला असल्याने ही गंभीर परिस्थिती ओढावली आहे. पहाटेपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. ऑक्सिजन अभावी खाजगी कोविड रुग्णालय सेवा बंद होणाच्या मार्गावर आहेत.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *