Thu. Sep 29th, 2022

ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये रात्री किंवा पहाटेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असल्याने ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये. शिवाय कोणताही धोका नको म्हणून या सेंटरमधील २६ रुग्णांना तातडीने ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयांना रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी तिकडूनच सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. शिवाय रायगडमधून उर्वरित महाराष्ट्रातही ऑक्सिजन पुरवायचा आहे. त्यामुळे आपल्या सकाळपासून गाड्या प्रतीक्षेत आहेत. पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये शनिवार रात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे. हा साठा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या बाबतीत आम्हाला धोका पत्करायचा नसून कोणतीही गडबड होऊ नये म्हणून या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनवरील रुग्ण ग्लोबल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार तात्काळ रुग्ण ग्लोबल रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अन्य रुग्ण कोविड सेंटरमध्येच असल्याचे त्यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.