Sun. Jun 20th, 2021

पावसाळ्याचा आनंद लुटायला ‘या’ धबधब्यावर जाऊन पाहा…

निसर्गाचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर उर्से टोल नाक्याजवळील ओझर्डे गावातील सुंदर धबधब्याला यंदा भेट द्या..

सर्वत्र झालेल्या पावसाने सध्या नद्या नाले ओसांडून वाहत आहेत. धबधब्याचा आनंद देखील पर्यटक लुटत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र लोणावळा खंडाळा म्हटलं की गर्दी आलीच. परंतु पुणे-मुंबई एक्सप्रेस वे च्या शेजारी ओझर्डे गावाच्या वेशीवरील एक अप्रतिम धबधबा मात्र अजून गर्दीपासून अलिप्त आहे.

द्रुतगती महामार्गावर वसलेले डोंगर कुशीतील ओझर्डे गाव.

पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघतो.

गावातील भात खाचरे, हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, गावातील कौलारू घरं गावातील निसर्ग सौंदर्यात अजून भर घालत असतात.

खरंतर पर्यटन प्रेमी आणि पंचक्रोशीतील नागरीकांनाही ओझर्डे येथील या सुंदर धबधब्यांची कल्पनाच नाही.

सध्या पर्यटक लोणावळा,मळवली,खांडी, भूशी,पवना आदी धरणे बघण्याकरीता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जातात. पण याच आढे ओझर्डे, ऊर्से डोंगरावर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. बरीच वाहने डोंगरापर्यंत पोहचत असल्याने सोमाटणे येथून हा धबधबा आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओझर्डे धबधब्यावर सहज पोहोचता येतं.

तसंच या धबधब्यासमोर असणारे जाईबाई माता मंदीर जागृत असुन महाराष्ट्रा भरातुन भाविक या ठिकाणी याञेला व इतर वेळेस दर्शनासाठी येत असतात.

त्यामुळे पर्यटक प्रेमींना अगदी जवळ असलेल्या या धबधब्याचा आनंद कुठलाही वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास न होता घेता येईल..

सध्या मुसळधार पावसामुळे जाईबाई मंदिराच्या समोरील धबधबा कुठेही पहायला मिळणार नाही.

कातळाला टाका असल्या कारणाने पाणी प्रचंड वेगाने पाइपमधून बाहेर पडावं तसं पडत असतं.

एखादा मोठा पाईप फुटल्यानंतर पाणी जसं दिसतं, त्याप्रमाणे हे पाणी दिसतं. त्यामुळे नागरिक देखील या धबधब्याकडे आकर्षित होतील यात काही शंका नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *