चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर केली टीका

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी “निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली असून त्यांनी म्हटलं, सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली.अर्थमंत्र्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या स्थितीची कल्पना नसल्याचे दिसते. सीतारामन यांनी फक्त निवडणुका असलेल्या राज्यांकडे लक्ष दिले आहे”, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली. निर्मला सीतारामन यांनी गरीब आणि स्थलांतरीतांची फसवणूक केली, असं म्हणत त्यांनी पेट्रोल, डिझेलसह अनेक उत्पादनांवर उपकर लावले.
प्रतिलिटर पेट्रोलवर २.५० रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर चार रुपये. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी हा झटका आहे, असं चिदंबरम यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात मद्यप्रेमींनाही झटका दिला असून आता मद्य आणि तत्सम पेय इत्यादींच्या किंमतीमध्ये अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.