Thu. Dec 12th, 2019

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची धाड

वृत्तसंस्था, चेन्नई

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज सकाळी छापा टाकला.

 

चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. INX मीडियाला दिलेल्या मंजुरीबाबत ही छापेमारी करण्यात आली. पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर INX कंपनीला झुकतं माप देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने चेन्नई, दिल्ली, नोएडा अशा 14 ठिकाणी छापे मारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *