एशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता

बॅडमिंटन एकेरीत अंतिम फेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. तिला रौप्य पदकावरचं समाधान मानावं लागलं आहे.

मात्र सिंधूने रौप्य पदक मिळवले असले तरी तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

सायना नेहवालने रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर अंतिम फेरी गाठलेल्या सिंधूकडून भारतीयांच्या जास्त अपेक्षा होत्या.

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगशी सिंधूची अंतिम लढत होती. खेळाची सुरुवात सिंधूने आक्रमक केली होती.

दोघांमधील सामना सुरुवातीला चांगलाच रंगला होता. दुसऱ्या गेमपर्यंत यिंग 11-7 ने पुढे होती. त्यानंतर सिंधूने कमबॅक करत पॉइंट्समधलं अंतर कमी केलं. मात्र काही ठिकाणी तिने पॉइंट्स घालवले.

Exit mobile version