Fri. Jul 30th, 2021

पाभे ग्रामस्थ भीतीच्या छायेत, कधी मिळणार त्यांना मदत?

भीमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भीमानदीने रौद्ररूप धारण केलंय. भीमाशंकर जवळील पाभे गावात दोन दिवसांपासून पुराचं पाणी शिरलंय. एवढंच नव्हे तर गावाच्या बाजूलाच असणाऱ्या डोंगराचंही पावसाच्या तडाख्यामुळे भूस्खलन होण्याची भीती आहे. संपूर्ण गावच त्यामुळे भीतीच्या छायेखाली आहे मात्र गावाला अद्यापही प्रशासनाकडुन कुठलीच मदत मिळत नाही

पाभे गाव भीतीच्या छायेत!

पाभे गावालगत भीमानदीवरील बंधाऱ्याचा पाण्याचा फुगवटा वाढलाय.

गावात दोन दिवसांपासून पाणी शिरलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

या गावात रहाणारी 100 कुटुंबं आणि पाळीव जनावरं भीतीच्या चायेत आहेत.

गावातील लोक मदतीसाठी आवाहन करत आहेत..

पाभे गावाला जाण्यासाठी येथे गावानजीक भीमानदीवर पूल कम बंधारा बांधण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षं या बंधाऱ्यात पाणी साठवण्यात येतं.

मात्र पावसाळ्यापूर्वी पुलाच्या सर्व गेटचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो.

यावर्षी मात्र प्रशासनाने केवळ वरचे ढापे काढले.

खाली दोन थर काढले नसल्याने पुलात अगोदरच सुमारे पाच फुट पाणी साठा राहिला होता.

आठ दिवसांपासून भीमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे.

भीमेला पूर आल्याने पुलाच्या पाण्याचा फुगवटा गावापर्यंत आला आहे. गावात पाणी शिरले आहे

पाणी शिरल्याने नागरिक अडचणीत असताना दुसरं संकट डोक्यावर आहे. गावाच्या मागे मोठा डोंगर असल्याने जोराच्या पावसात भूस्खलन होण्याची भीती आहे. प्रशासनाकडे मदतीसाठी ग्रामस्थांनी आवाहन केलं आहे. मात्र अजूनही त्यांना मदत मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *