Fri. Oct 2nd, 2020

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्ममश्री पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना केंद्र सरकराचा मानाचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सुरेश वाडकर यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. वाडकर यांना 2007 साली महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणार ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

वाडकरांना 2011 साली ‘मी सिंधुताई सपकाळ’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

तसेच मध्य प्रदेश सरकारनेही प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या ‘लता मंगेशकर पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले होत.

सुरेश वाडकर यांची प्रसिद्ध गाणी

ए जिंदगी गले लगा ले

चप्पा चप्पा चरखा चले

मेघा रे मेघा रे

सपने में मिलती है

ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था

तू सप्तसूर माझे

सुरेश वाडकरांची ‘प्रेम रोग’ आणि ‘सदमा’ या चित्रपटातील गाणी फार गाजली.

सुरेश वाडकर यांनी कोकणी, मल्याळी, बंगाली, सिंधी आणि अशा बऱ्याच भाषेतून  गाणी गायली आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *