Thu. Jun 17th, 2021

पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी डॉ. के. के. अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला. अग्रवाल यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते.

डॉ.के.के.अग्रवाल यांनी संकटाच्या वेळी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले.२०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *