Mon. Jan 17th, 2022

‘युद्ध नको, शांती हवी’- इम्रान खान

‘युध्द सुरु झाल्यास मोदी आणि माझ्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे भारतानं पाकसोबत चर्चा करावी. दोन्ही राष्ट्रांनी एकत्र बसून तोडगा काढावा’, अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. पुलवामामधील घटना निश्चितच दुःखद आहे. आम्ही या हल्ल्याची चौकशी करायला तयार आहोत, तसंच दहशतवादासंदर्भात चर्चा करायलाही तयार आहोत. तेव्हा युद्धाऐवजी शांतपूर्ण चर्चा करावी, असं इम्रान खान यांनी केलंय.

पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्यात आली. त्यानंतर इम्रान यांनी आपली भूमिका मीडियापुढे जाहीर केली. पाकिस्तानची कोंडी होऊ लागली आहे. अशावेळी इम्रान खान यांनी भारताला शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याचं आवाहन केलंय.

काय म्हणाले इम्रान खान?

भारतात निवडणुकांच्या तोंडावर भारताने हवाई हल्ला केला.

भारताने आमच्या हद्दीत घुसखोरी केली

त्यामुळे पाकने सुध्दा सीमा पार केली

भारतान हवाई हल्ला केला त्यामुळे पाकला हल्ला करावा लागला

पाकने भारताचे दोन विमानं पाडलीत.

दोन भारतीय पायलट पाकच्या ताब्यात आहेत.

भारताकडे जे शस्त्र आहेत ते पाककडेही आहे.

युध्द सुरु करणं सोपं आहे

मात्र ते सुरू झाल्यावर बंद करणं कठीण आहे

एकदा युद्ध सुरू झाल्यास माझ्या किंवा नरेंद्र मोदी यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही.

पुलवामा हल्ल्याचं दुख समजू शकतो. भारताला चर्चेसाठी पुन्हा आमंत्रीत करतोय

शांतता प्रस्थापित झाली पाहिजे.

त्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करावी

पुलवामा हल्यानंतर संयुक्त चौकशीचा प्रस्ताव मी दिला.

मात्र भारताने नाकारला.

 

मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात

इम्रान खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध तसंच अफगाणिस्तान, व्हिएतनाममधील युद्धांचेही दाखले दिले.

मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात. त्यामुळे युद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि भारताने एकत्रितपणे दहशतावादाशी सामना करण्यासाठी चर्चा करावी आणि युद्ध टाळावं, असं आवाहन इम्रान खान यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *