Sat. Jul 31st, 2021

मोदींनी ‘ही’ मोठी चूक केली – इमरान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा काढून मोठी चूक केली, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलं आहे.

पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा दिन काश्मीर समर्थन दिन म्हणून पाळला जातो.  या निमित्ताने इमरान खान यांनी हे वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत इमरान खान बोलत होते.

काय म्हणाले इमरान खान ?

मोदींनी  पाकिस्तानला निवडणुकीमध्ये बळीचा बकरा केला.  यामुळेच मोदींना जनमत मिळालं. मिळालेल्या जनमतामुळे मोदींनी सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला.

त्यामुळे मोदींनी ही मोठी चूक केली असल्याचं इमरान खान म्हणाले.

हिंदू राष्ट्रावादाचा भूत बाटलीबाहेर आलाय. तो भूत आता बाटलीत परत टाकणं शक्य नाही, असंही इमरान खान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *