Fri. Sep 20th, 2019

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं मान्य- काश्मीर भारताचंच!

0Shares

भारताने जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारं Article 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरलंय. हरेक पद्धतीने पाकिस्तान भारताला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतंय. मात्र पाकिस्तानला कुणाचीच साथ मिळत नाहीय. परिणामी पाकिस्तान (Pakistan) तोंडघशी पडतंय.

आता तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानी मंत्र्यांनीही ने काश्मीर भारताचं असल्याचं स्पष्ट केलंय.

जम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी UNHRC मध्ये दिली आहे.

या परिषदेला संबोधित करताना शाह महमूद कुरैशी यांनी ही कबुली दिली.

जिनिव्हा येथे 72 वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) सुरू आहे.

तब्बल 72 वर्षानंतर पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.

मात्र जम्मू-काश्मीर भारताचं राज्य आहे, असं सांगतानाच कुरैशी यांनी भारतावर टीकाही केली.

काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) प्रस्तावांचं उल्लंघन होत आहे, असं धांदात खोटा आरोप करतानाच या परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्याने केली. काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशीही मागणीही शाह यांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *