Tue. Oct 27th, 2020

पाकिस्तान बिथरलं, 15 ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा येणार अर्ध्यावर !

यंदाचा 15 ऑगस्ट हा भारत सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर साजरा होणारा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळं महत्त्व असणार आहे. काश्मीर खोऱ्यात तिरंगा दिमाकात फडकणार आहे. मात्र हाच दिवस पाकिस्तानमध्ये मात्र काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. या संदर्भात पाकिस्तान सरकारने पत्रक जाहीर केलंय.

4 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र दिन असतो.

या दिवशी देखील पाकिस्तान आणि काश्मीरमधल्या एकात्मतेचंच दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर करण्याचा घाट पाकिस्तान सरकारने घातला आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी काळा दिवस जाहीर करण्यात आला आहे.

या दिवशी पाकिस्तानचा झेंडाही अर्ध्यावर आणला जाईल.

या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही, अशी सूचनाच एका पत्रकामार्फत पाकिस्तान सरकारने सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स तसंच FM रेडिओ स्टेशन्सनाही देण्यात आली आहे.

या उलट काश्मीरबद्दल पाकिस्तानला असणारं प्रेम आणि काश्मीर पाकिस्तानचंच अंग कसं आहे, हे बिंबवणाऱ्या बातम्या प्रक्षेपित कराव्यात, अशी सूचना दिल्या आहेत.

काश्मीरवर भारत अत्याचार करतोय आणि पाकिस्तानच काश्मीरींचं आश्रयस्थान आहे असं व्हिडिओंद्वारे दाखवण्याची जबरदस्तीही पाकिस्तानातील मीडियावर करण्यात आली आहे.

यामुळे पाकिस्तानी लोकांमध्ये काश्मीर आपल्याच देशाचा भाग आहे, अशी भावना जागृत होईल, भारताबद्दल आणखी द्वेष पसरेल आणि काश्मीरमध्ये जेथे पाकिस्तानी वाहिन्या दिसतात, तेथील लोकांचाही बुद्धीभेद होऊल अशी पाकिस्तान सरकारची अपेक्षा आहे.

एकूणच कलम 370 रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *