Thu. Dec 2nd, 2021

पाक लष्करप्रमुखांच्या कार्यकाळात तीन वर्षांसाठी वाढ; इम्रान खान यांनी दिली मंजुरी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्याची मंजुरी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. काश्मीर प्रश्नी भारत- पाकमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं आहे. बाजवा तीन महिन्यानंतर निवृत्त होणार असतानाही त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास इम्रान खान यांनी मंजुरी दिली आहे.

पाक लष्करप्रमुखांच्या कार्यकाळात वाढ –

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कामर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.

बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मंजुरी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

जम्मू – काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत -पाकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

2016 साली नवाज शरीफ यांनी लष्कर प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

तसेच येत्या तीन महिन्यात बाजवा यांची निवृत्ती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इम्रान खान यांचं सरकार निवडून आणण्यात लष्कराची मोठी भूमिका बजावली आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये पाक लष्कर आणि पाक सरकारमध्ये चांगले संबंध आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *