Sat. Jul 31st, 2021

हाफीज सईदला ११ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमांईड हाफीज सईदला ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी न्यायलयाने ११ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बुधवारी ही शिक्षा सुनावली.

दहशतवाद्यांना हाफीज सईदने दोन प्रकरणांमध्ये आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आलं.

हाफीज सईदला १७ जुलैला अटक करण्यात आली होती. लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये हाफीज सईदला ठेवण्यात आले आहे.

लाहोर आणि गुजरनवाला शहरात हाफीज सईदवर दहशतवादाला आर्थिक मदत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होते.

या दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयाने सईदला प्रत्येकी साडे पाच वर्ष शिक्षा आणि १५ हजार दंड ठोठावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *