Jaimaharashtra news

आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर बनला भारताचा जावई!

पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली आता भारताचा जावई झाला हे. मंगळवारी त्याचा शामिया आरजू या हरियाणातील मुलीशी निकाह झाला. शामिया हरियाणातील नूंह येथे राहते. ती एअर एमिरेट्समध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे.

दोघांची भेट गेल्यावर्षीच झाली होती.

तेव्हापासून दोघं एकमेकांच्या प्रेमात होते.

शामियाच्या पणजोबांनी हा विवाह ठरवला.

20 ऑगस्ट रोजी हसन अली आमि शामिया आरजू यांचा दुबई येथे निकाह झाला.

दुबईतील अटलांडिस पाम जुमेरा पार्क येथे दोघे मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले.

हसन अली पूर्वी झहीर अब्बास, मोहसिन खान, शोएब मलिक यांसारख्या पाकिस्तानी क्रिकेटर्सनी भारतीय मुलींशी निकाह केले आहेत.

त्यात हसन अलीची आता भर पडली आहे.

हसन अली हा पाकिस्तानी क्रिकेटर असून त्यांनी आत्तापर्यंत 9 टेस्ट मॅचेसमध्ये 31 विकेट्स घेतल्या आहेत.

तसंच 53 वनडे सामन्यांत 82 विकेट्स मिळवल्या आहेत.

Exit mobile version