Fri. Oct 7th, 2022

कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे तणाव दूर होणार ?

सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा मार्ग ठरु शकतो.

कारण याप्रकरणी चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे.

शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावं यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे.

यासंबंधी दोन्ही देशांमध्ये करारावर 14 मार्च रोजी चर्चा होणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानचे एक पथक दिल्लीला येणार आहे.

पाकिस्तानकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे.

त्याचबरोबर भारतालाही या कॉरिडॉर संबंधी चर्चेसाठी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

1522 मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला.

त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून 4 किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.