पाकचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरची कसोटी सामन्यातून निवृत्ती

पाकिस्तान संघाचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. 27 वर्षीय मोहम्मद आमिरने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निवृत्ती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान संघासोबत काम करण्यास मला संधी आणि प्रतिनिधीत्व करायला मिळाल्यामुळे मला अभिमान आहे.

जलदगतीचा गोलंदाज मोहम्मद आमिर निवृत्त –

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निवृत्ती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संधी दिल्याबद्दल आभार मानत असल्याचे आमिरने म्हटलं आहे.

तसेच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने अभिमान वाटत आहे.

मोहम्मद आमिरने आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत.

या सामन्यांमध्ये आमीरने 30च्या सरासरीने 119 बळी घेतले.

वन-डे विश्वचषकात संघाला विजतेपद मिळवून देता आले नाही.

मात्र टी-20 मध्ये विश्वचषकात संघाला विजयी बनवणार असल्याचे मोहम्मद आमिरने म्हटलं.

 

Exit mobile version