Sat. Apr 17th, 2021

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराने दिले चोख उत्तर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लघंन करण्यात आले. आरएसपूरा आणि अरनिया परिसरातील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा गोळीबार केलाय. या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झालाय.

सैन्य दिनी भारतीय लष्कराकडून जबरदस्त दणका मिळाल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

आरएसपूरा आणि अरनिया येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना टार्गेट करत गोळीबार केलाय.

माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरु होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *